संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नागपुरात कार-दुचाकीच्या अपघातात चौघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर : नागपूरमधून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे ७० ते ८० फूट उंचीवरुन खाली फेकले आणि त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पूलावरुन जाणाऱ्या चार दुचाकींना मागून येणाऱ्या एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकींचा जागीच चुराडा झाला. दुचाकीवर असलेल्या व्यक्ती पुलावरुन खाली पडले. या भीषण अपघातामध्ये चौघाचा मृत्यू झाला .पोलिसांनी धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.मृत पावलेल्यांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातावेळी हा चारचाकी मालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami