संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नागपुरातील सर्व तलाव महापालिकेकडून सील

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – नागपूर शहरातील सर्व तलाव गणेश विसर्जनासाठी बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला आहे. तलावांच्या संरक्षणासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पत्रे लावून सर्व तलाव सील केले आहे. भाविकांना कृत्रिम तलावांत गणेश विर्सजन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
नागपूर शहरात तलावाची संख्या अधिक आहे. या तलावांना जल प्रदूषणापासून वाचवण्यासाठी नागपूर महापालिकेने आता चांगलीच कंबर कसली आहे. तसेच शहरातील सर्व तलावांच्या परिसरावर करडी नजर ठेण्यासाठी महापालिकेने सीसीटीव्ही लावले आहे. नागपूरातील प्रसिद्ध फुटाळा तलावासह अनेक तलावांना चारही बाजूने पत्र लावून सील केले आहे. या तलाव परिसरात आता सर्वसामान्य लोकांना जाण्यास पुणपर्ण बंदी आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami