संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

नागपुरातही पुन्हा कोरोनाचा शिरकाव; २४ तासांत आढळले ९ नवे कोरोना रुग्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच काल बुधवारी नागपुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर अचानक ९ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमधील नागपुरातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे.

नव्याने आढळून आलेल्या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण शहरातील, तर ५ रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरच्या ग्रामीण भागात सातत्याने नवीन रुग्ण आढळत असले तरी शहरी भागात मात्र फारसे रुग्ण आढळत नव्हते. परंतु बुधवारी ग्रामीणसह शहरातही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, या नवीन रुग्णांमुळे शहरी भागातील कोरोनाबाधितांची आजपर्यंतची एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९९ हजार ६६९ वर पोहोचली आहे. तर, ग्रामीण भागातील आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ६८ हजार २१८ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोनामुळे दगावला नाही. सध्या जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचे प्रमाण ९८.२१ टक्के इतके आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami