संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

नांदेड-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून दोनदा नव्हे तर आता दररोज धावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. कारण आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड-पुणे एक्सप्रेस आता रोज धावणार आहे.मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १२७३०/१२७२९ या द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचून पुण्याहून सुटणार आहे. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना या महत्त्वाच्या शहरात जाणे सोयीचे होईल. येत्या ५ जुलैपासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने सुरु होईल. या गाडीचा १२७३०/१२७२९ हा क्रमांक बदलून १७६३०/१७६२९ असा करण्यात आला आहे.

या गाडीची पहिली फेरी दिन येत्या ४ जुलै रोजी जालना येथून सुटेल.पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे शेवटचे स्थानक बदलून ते पुणे करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर झाले आहे. मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्री सोयीच्या वेळेनुसार ही रेल्वे गाडी चालवली जात आहे, जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचतील. गाडी क्रमांक १७६३० नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १७६२९ पुणे – नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री ९.३५ वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी १०.२० वाजता पोहोचेल.दरम्यान ही ट्रेन मराठवाड्याला महाराष्ट्राचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुण्याशी जोडते. आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देईल. प्रवाशांना निर्धोक आणि सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत आणि प्रवेश दारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami