संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

नांदेडमध्ये कार-ट्रकचा भीषण अपघात एकाच कुटुंबातील चौघे ठार, एक जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – जिल्ह्यातील नांदेड – हैदराबाद महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण
एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.तर एक चिमुरडी जखमी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात कारता चक्काचूर झाला आहे. नायगाव तालुक्यातील (तमा) टाकळी येथून केरुर येथे मृत कुटुंबातील पाच सदस्य जात होते. त्यावेळी देगलूरकडून येणाऱ्या ट्रकची आणि यांच्या कारची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा-मुलगी असे चार जण जागीच ठार झाले. मात्र, त्याच कारमध्ये असणारी नात सुदैवाने बचावली असली तरी ती देखील गंभीर जखमी आहे.अपघात काल रात्री आठच्या सुमारास नांदेड जिल्ह्य़ातील नायगाव तालुक्यातील कुंचेली फाटा येथे झाला.या भीषण अपघातातील मृतांची नावे- शंकरराव जाधव, महानंदा जाधव, धनराज जाधव आणि कल्पना शिंदे अशी असून ते एका कुटुंबातील आहेत. तर नात स्वाती पाटील ही गंभीर जखमी असून तीच्यावर नांदेड च्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातस्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर अपघातामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली होती.शिवाय या एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाने घाला घातल्याने केरूर आणि तमा टाकळी गावावर शोककळा पसरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami