संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नांदेडच्या धावरीत वीज पडून २ ऊसतोड कामगारांसह ३ ठार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड- परतीच्या पावसात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ ऊसतोड कामगारांसह तिघांचा मृत्यू झाला. ही घटना लोहा तालुक्याच्या धावरीत घडली. यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
नांदेड आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस पडला. त्यात धावरीत वीज अंगावर पडून माधव डुबुकवाड (४५) आणि पोचीराम गायकवाड हे २ ऊसतोड मजूर आणि रूपाली गायकवाड (१०) या मुलीचा मृत्यू झाला. पूजा डुबुकवाड ही १७ वर्षांची मुलगी जखमी झाली. तिला नांदेडच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami