संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

नवाब मालिकांना मतदानाची परवानगी हायकोर्टाने नाकारली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनी लॉड्रिगप्रकरणी जेलमघ्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याची संधी मिळावी,यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळून लावली आणि त्यांना मतदानाची परवानगी नाकारली. याबाबत नव्याने याचिका दाखल करावी, असे हायकोर्टाने नवाब मलिकांच्या वकीलांना सांगितले. तसेच वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मतदान करता यावे, म्हणून हायकोर्टात पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले असून त्यांच्या याचिकेवर 15 जूनला सुनावणी होणार आहे.

यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी मलिक आणि देशमुखांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, ईडीने त्यांच्या याचिकेला विरोध केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर मलिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र ही याचिका देखील हायकोर्टाने फेटाळली.तसेच देशमुखांनी हायकोर्टात कोणतीच याचिका दाखल केली नव्हती. त्यामुळे मालिक आणि देशमुखांना राज्यसभेसाठी मतदान करता आले नाही.आता विधान परिषदेसाठी मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी मलिक आणि देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यातील मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत हायकोर्टाने मालिकांना मतदानाची परवनगी नाकारली.तर देशमुखांच्या याचिकेवर 16 जूनला सुनावणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami