संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

नवापूर आणि विसरवाडीतील जनावरांचा बाजार बंद आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवापूर – नंदुरबार जिल्ह्यातील लंपी स्किन डिसीज या गुरांवरील आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवापूर व विसरवाडी येथील जनावरांचा बाजार बंद केला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांना गुरे-ढोरे, जनावरे बाजार आवारात विक्रीस पुढील आदेश येईपर्यंत आणू नये; असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे यांनी केले आहे.
राज्यामध्ये सध्‍या लंपी स्किन डिसीज या जनावरावरील साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यास अनुसरुन नंदुरबार जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरे बाजार व जनावरे वाहतूक बंद करण्याच्या सुचना मिळालेल्या आहेत.शासन अधिसूचना असाधारण १६७ व ८ सप्टेंबर २०२२ च्या नुसार प्राप्त झालेल्या आहेत.त्याअनुषंघाने कृषि उत्पन्न बाजार समिती नवापूर, उपबाजार विसरवाडी येथील जनावरे बाजार पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत बंद करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami