संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 29 January 2023

नववर्षी सायन-पनवेल महामार्ग एलईडीने चमकणार !वीजबिलात ९४ लाखांची बचत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- महाराष्ट्र आणि राजधानी जोडणार्‍या सायन-पनवेल मार्गावरील पालिका हद्दीतील दिवाबत्तीची उघडझाप सातत्याने अपघाताला आमंत्रण देत असल्याने आगामी नवीन वर्षी हा मार्ग एलईडी दिव्यांच्या उजेडात चमकत असलेला दिसणार आहे.त्यासाठीचे काम सुरू झाले आहे. एलईडी बसवल्यामुळे महिन्याला वीजबिलात ९४ लाखांची बचत होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत ६२८ बंद दिव्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

महापालिकेने आता या महामार्गावरील पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसह नवीन एलईडी दिवे लावण्याचे १०.५४ कोटींचे काम केले जात असून या कामाला वेगात सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई हद्दीतून जाणार्‍या महामार्गावरील वाशी टोल नाका ते सीबीडी बेलापूर हा भाग नवी मुंबई महापालिका हद्दीत येत असून या मार्गाची मालकी सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याच्या दुरवस्थेविषयी सततच्या दिवाबत्तीविषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महापालिकेस दोष दिला जात होता. याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने होत असे.या महामार्गावरील ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे दिवाबत्ती हस्तातंरित करण्यात आल्यानंतर पालिकेकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या कामासाठी १०.५४ कोटी खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जात आहे.एलईडी लावण्यासाठी आणि त्याची ५ वर्षे देखभाल करण्यासाठी मे.रॉयल पॉवर टेक या कंपनीला या कामाचे कार्यादेश दिले असून, एलईडी फिटिंग लावण्याबरोबरच ५ वर्षांची देखभाल-दुरुस्तीही संबंधित ठेकेदाराला दिली आहे. सुरवातीला महमार्गावरील अंधार दूर करण्यासाठी ६२८ बंद दिव्यांची दुरुस्ती केली आहे.

सहशहर अभियंता शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता सुनील लाड यांच्या प्रयत्नातून काम वेगाने सुरू आहे.पालिकेने प्रथम महामार्गाचा सर्व्हे करून बंद दिवे दुरुस्त करून घेतले आहेत तसेच महामार्गावरील धोकादायक व खराब झालेले पथखांब काढून घेतले असून विविध भागांतील ट्रान्सफार्मर बदलण्यात आले.नववर्षात याच मार्गावर पालिका सर्व पथदिवे एलईडीचे लावणार असून त्यातून महिन्याला ९४ लाखांची वीजबचत होणार असून सातत्याने महामार्गावर होणारी पथदिव्यांची डोळे मिचकावणी बंद होणार आहे.दिवाबत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ कोटी २९ लाखांची रक्कम पालिकेने प्रदान केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami