संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नवरात्रीच्या भगरीतून औरंगाबाद, जालन्यात ३७ जणांना विषबाधा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद- नवरात्रीनिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीच्या पिठातून ३७ जणांना विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यात घडली. औरंगाबादच्या लासूर स्टेशन भागात १३ जणांना व जालना जिल्ह्यातील ४ गावांमधील २४ जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त औरंगाबादच्या लासूर रेल्वे स्थानक परिसरातील दुकानातून अनेक गावांमधील नागरिकांनी भगर आणि भगरीचे पीठ खरेदी केले. मात्र त्यातून १३ जणांना विषबाधा झाली. पोटात दुखणे, चक्कर येणे आणि उलट्या असा त्रास या नागरिकांना सुरू झाला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी लासूर स्टेशन भागातील संबंधित दुकानातून भगरीचे पीठ जप्त केले. त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. जालना जिल्ह्यातही परतुर तालुक्याच्या ४ गावांमधील २४ जणांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यात महिलांची संख्या जास्त आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami