संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नवनीत राणांच्या अटकेची शक्यता! शिवडी कोर्टाकडून वॉरंट जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती- बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून दुसऱ्यांदा वॉरंट जारी करण्यात आले असून त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.त्यामुळे नवनीत कौर राणांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

याप्रकरणात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात न्यायालयाने 6 सप्टेंबरच्या सुनावणीत राणा आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या हजेरीतून सूट देण्याच्या अर्जास परवानगी दिली होती. मात्र गुरुवारी 22 सप्टेंबरच्या सुनावणीत दोन्ही आरोपी पुन्हा गैरहजर राहिले. राणांच्या वकिलाने पुन्हा हजेरीतून सूट आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगितीसाठी अर्ज केले होते.मात्र दोन्ही अर्ज फेटाळत न्यायालयाने दोघांविरोधात पुन्हा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.त्यामुळे पुढच्या सुनावणीला दोघांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागले अथवा सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami