संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नवजात बालकांची हत्या करणाऱ्या “सीरियल बेबी किलर’ नर्सला अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन- ७ नवजात बालकांचा बळी घेणाऱ्या आणि अन्य १७ बालकांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरू सीरियल बेबी किलर नर्सला पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिटनच्या रुग्णालयातील ३२ वर्षाच्या लेटबी या नर्सने २०१५ ते २०१६ दरम्यान चेस्टर रुग्णालयात इंजेक्शन देऊन मुलांना मारल्याचा आरोप आहे.
ब्रिटनच्या चेस्टर रुग्णालयात काम करणारी लेटबी नर्स नवजात अर्भकांना इन्सुलीन देत होती. काही मुलांच्या पोटात रिकाम्या इंजेक्शनने हवा भरत होती. अशाप्रकारे तिने ७ नवजात बालकांची हत्या केली. इतर १७ मुलांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. शेवटी या प्रकरणी नर्सला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर न्यायालयात खटला भरला आहे. दरम्यान, नर्सने २२ मुलांच्या हत्या आरोपांचा इन्कार केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami