संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

नगर शहरातील सर्व सरकारी कार्यालयात हेल्मेट सक्ती !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर – नगरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने नगर शहरातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये आता हेल्मेट सक्तीचा आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी खूद्द प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयापासून करण्यात आली आहे.

तसेच इतर सरकारी कार्यालयाच्या विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठवून हेल्मेट सक्त बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना हेल्मेट घालूनच यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचनेनुसार नगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी हेल्मेट सक्ती बाबतचे आदेश काढले.विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या नागरिकांना हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी विविध शासकीय ऑफिसमध्ये जाऊन हेल्मेट सक्ती बाबत पाहणी करणार आहेत. त्याठिकाणी विना हेल्मेट आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आत मध्ये प्रवेश करण्याआधीच हेल्मेट सक्ती बाबतचे बोर्ड लावण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात विना हेल्मेट दिसल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे.त्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या हेल्मेट सक्तीच्या माध्यमातून हजारो रुपयांचा दंड आत्तापर्यंत वसूल करण्यात आला आहे.त्यामुळे आता हळूहळू नागरिकांनाही या हेल्मेटची सवय लागली आहे.नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हा उपक्रम राबवत असल्याचे उर्मिला पवार यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या