संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

नंदुरबारमध्ये 10 ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात 149 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊन उमेदवारी अर्जाची छाननी झाली आहे. मात्र या जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील 6 ग्रामपंचायती तर नंदुरबार तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीसाठी एक एक अर्ज आल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत.
नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 315 तर सदस्यांसाठी 1447 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीमध्ये सरपंचपदाचे 12 तर सदस्यपदाचे 25 अर्ज बाद ठरले. तर शहादा तालुक्यात सरपंचपदाचे 4 तर सदस्यपदाचे 25 अर्ज बाद ठरले.सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने चुरस अधिक वाढली आहे.राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत आहेत. दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा प्रणाला लावली आहे. माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय स्थितीचे स्पष्टीकरण करणाऱ्या या निवडणुका ठरतील. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नेते या निवडणुकींकडे लक्ष ठेवून असून आपल्या गटाला जास्त जास्त ग्रामपंचायती कशा मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami