संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नंदुरबारच्या चरणमाळ घाटात बसदरीत कोसळून २ ठार! ४० जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवापूर- नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरच्या चरणमाळ घाटात शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. खासगी बस दरीत कोसळली. त्यात २ जण ठार झाले, तर अन्य ४० प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नवापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्वजण बागलाण परिसरातील मजूर आहेत.

नंदुरबारच्या पिंपळनेर येथून गुजरातकडे खासगी लक्झरी बस जात होती. शनिवारी रात्री ही बस चरणमाळ घाटात आली तेव्हा उतारावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ती दरीत कोसळून अपघात झाला. त्यात १८ महिन्यांच्या बालकासह २ जण ठार झाले. अपघातात इतर ४० जण जखमी झाले आहेत. त्यातील २२ जणांवर उपचार करून त्यांना सोडून दिले. मात्र १८ गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर नवापूर, नंदुरबार आणि सुरत येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते बागलाण परिसरातील रहिवासी आहेत. मजुरीसाठी ते बसमधून गुजरातला जात होते. चरणमाळ घाटात त्यांच्या बसला अपघात झाला. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरा बसमधील जखमींना बाहेर काढून नवापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर १८ गंभीर जखमींना नंदुरबार आणि सुरत येथील रुग्णालयात हलवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami