संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

धोकादायक वळणावर भीषण अपघात तीन मित्रांचा मृत्यू,एक गंभीर जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली – जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात तिघेजण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ ओढ्याजवळ घटना घडली आहे. या अपघातात अजित नेताजी भोसले (२२), मोहित शिवाजी तोरवे (२१), राजेंद्र भाले (२२) हे तिघे ठार झाले आहे. तर संग्राम विक्रम तोरवे (१६) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. कोसारी येथे आज पहाटे साडेपाच वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने कोसारी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते. हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. दरम्यान, बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. एकाच मोटरसायकलवर चौघे जण प्रवास करत होते. यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला. घटनेचे गांभीर्य ओळखत मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे मोहित तोरवे, राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami