धुळे- महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. या अंदाजानुसार धुळे आणि साक्री तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धुळे तालुक्यातील नेर, कुसुंबा, देवर आणि साक्री तालुक्यातील म्हसदी, म्हैसमाळ या गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला.
धुळेसह साक्री तालुक्यात सोमवारी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसात गहू आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले. ही पिके पूर्णपणे तयार होती. अशातच झालेल्या या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.