कानपूर – मैदानावर खेळत असताना मृत्यू झाल्याच्या काही घटना याआधी घडल्या आहेत.आता उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. कानपूर जिल्ह्यातील बिल्हौरच्या बीआयसी मैदानावर क्रिकेट खेळताना बॅटिंग करत असलेल्या २६ वर्षांच्या एका खेळाडूचा धाव काढत असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.अनुज पांडे (१६) असे मृत खेळाडूचे नाव आहे.
अनुज हा धाव काढण्यासाठी धावत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो अडखळत पीचवर पडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.मृत अनुजला आधी कोणताही आजार नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.त्याचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.