मुंबई :- ठाकरे गटातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना दोन दिवसांआधी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राणे कुटुंबाविरोधात बोलल्यानेच ही धमकी आल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. या धमकीला देशमुखांनी आव्हान दिले होते. दिलेल्या आव्हानाप्रमाणे देशमुख सकाळी ८:३० वाजल्यापासूनच नरिमन पॉईंटला दाखल झाले होते. १० वाजेपर्यंत प्रतिक्षा करूनही कुणीही न आल्याने तिथून निघालो. असे नितीन देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले.
राणे कुटुंबाविरोधात बोलल्याने ही धमकी आल्याचा आरोप नितीन देशमुखांनी केला होता. यात नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव फोनवरून धमकी देणाऱ्यांनी घेतले होते. मारून समुद्रात फेकून देण्याची धमकी फोनवरून दिल्याचे देशमुख्यांकडून सांगण्यात आले. या धमकीनंतर नितीन देशमुखानी थेट राणेंना आव्हान दिले होते. आज नरीमन पॉईंटला १० वाजता राणेंची वाट बघेन. त्यानुसार आमदार नितीन देशमुख आज सकाळी ८:३० वाजल्यापासून मुंबईच्या नरिमन पॉइंटवर वॉक करत होते. १० वाजून गेले मात्र धमकी देणारे अद्याप आले नाही. म्हणून शेवटी नितीन देशमुख त्या ठिकाणावरून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. ज्या लोकांचे आता पर्यंत खून झाले, ज्यांचा ठावठिकाणा लागला नाही अशांचा ३०२ चा गुन्हा नारायण राणे यांच्यावर लावण्यात यावा अशी विनंती देशमुखांनी शासनाला केली आहे.