संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

धक्कादायक! भूकबळीत भारताने पाकिस्तान, श्रीलंकेला मागे टाकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- भारतासाठी धक्कादायक बातमी आली आहे. जागतिक भूकबळीच्या आकडेवारीत भारताने कंगाल श्रीलंका आणि पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. भूकबळींच्या १२१ देशांच्या यादीत भारत १०७ व्या स्थानावर घसरला आहे. २०२१ मध्ये भारत १०१ व्या क्रमांकावर होता.

ग्लोबल हंगर इंडेक्सने २०२२ मधील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. १२१ देशांच्या या यादीत भारताचा क्रमांक १०७ आहे. २०२१ मध्ये भारत १०१ व्या स्थानावर होता. त्यात ६ अंकांनी घसरण झाली. विशेष म्हणजे या यादीत कंगाल झालेली श्रीलंका आणि पाकिस्तान भारताच्या पुढे आहेत. या यादीत पाकिस्तानचा क्रमांक ९९ तर श्रीलंकेचा ६४ आहे. नेपाळ ८१ आणि म्यानमार ७१ व्या स्थानावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व देशांत भारत १०७ व्या स्थानावर आहे. विनाशकारी महापूर, महागाईचा आगडोंब यामुळे उपासमारीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानची परिस्थिती भारताच्या तुलनेत चांगली असल्याचे वास्तव अहवालाने समोर आले आहे. पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पुराखाली गेला होता. लाखो लोक बेघर झाले. लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही भूकबळींच्या यादीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. श्रीलंकाही कंगाल झाली असली तरी या यादीत भारतापेक्षा तेथील परिस्थिती खूपच चांगली आहे. झांबिया, अफगाणिस्तान, तिमोर-लेस्टे, गिनी-बिसाऊ आदी देश भूकबळीच्या यादीत भारताच्या मागे आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami