नवी दिल्ली – भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी काल सोमवारी ‘ द वायर” या माध्यम वेबसाईटचे संपादक एम.के वेणू,जान्हवी सेन आणि संस्थापक वरदराजन यांच्या घरांवर छापे मारले.यावेळी पोलिसांनी संशयास्पद म्हणून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहे.
अमित मालवीय यांनी यांनी शनिवारी ‘द वायर “च्या वरिष्ठ संपाद्कांविरूढ केलेल्या प्राथमिक तक्रारीच्या आधारावरून पोलिसांनी काल ही छापेमारी केली.या वेबसाईट पोर्टलने आपली प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी करण्यासाठी काही बनावट कागदपत्रे तयार केली असल्याचा आरोप मालवीय यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.मालवीय यांनी ‘ द वायर” चे संस्थापक वरदराजन,संस्थापक संपादक सिद्धार्थ भाटीया, संपादक एम. के. वेणू, उपसंपादक व कार्यकारी वृत्त संपादक जान्हवी सेन फौन्डेशन फॉर इंडिपेंडंट जर्नालिझम आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत म्हटले आहे की,इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा आधार घेऊन बनावट कागदपत्रे दाखवून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न या सर्वांनी करत त्यांना याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे.