केरळ : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे.केरळमधील धर्मांतर आणि दहशतवादी घटनांची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या टीझरवर आता एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केरळचे डीजीपीआय यांनी तिरुअनंतपूरम येथील पोलीस आयुक्तांना या टीझरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. टीझरच्या विरोधात केरळच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या तक्रारीवरून हे आदेश देण्यात आले आहेत. या चित्रपटाचा टीझर शेयर केल्या नंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र या चित्रपटावरून नवी वाद होण्याची शक्यता आहे.
सदर टीझर मध्ये शालिनी उन्नीकृष्णन म्हणते की, मला नर्स व्हायचे होते पण आता मी इसीसची दहशतवादी आहे.या वाक्यावरूनच केरळमधील ३२,००० महिलांच्या तस्करी-धर्मांतराची हृदयद्रावक क्रूरता दाखवली जाईल. युट्युब वर शेअर केलेला टीझर १ मिनिट १९ सेकंदाचा आहे.