नवी दिल्ली- ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे’वर आज रविवारी सकाळी दोन बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन प्रवासी ठार, तर २० जण जखमी झाले आहेत. यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आज रविवारी सकाळी ग्रेटर नोएडा येथील नॉलेज पार्कजवळ नोएडा एक्सप्रेसवेवर दोन बस एकमेकांना धडकल्या.या भीषण रस्ता अपघातात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाल्याचे समजते. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान,पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून अपघाताचा तपास सुरू केला आहे.मृतांची ओळख अद्याप पटलेली नव्हती. शिवाय,अपघाताचे कारणही सध्या समजू शकले नाही.