ठाणे: पुण्यात भाजपाला रोखण्यासाठी शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते पुण्यातील पोटनिवडणूकित धर्मनिरपेक्षच्या नावावर मत मागत असल्याचा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मात्र हे दोन्ही पक्ष मुस्लिम आरक्षणाबद्दल काहीच बोलत नसल्यामुळे ते धर्मनिरपेक्ष कसे असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी मुंब्र्यातील जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला. त्यांच्याच पक्षाचे सहकारी नवाब मलिक, अजूनही तुरुंगात आहेत असे स्पष्ट करताना, ही राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्षता आहे, असे ते म्हणाले. महाशिवरात्री दरम्यान पुण्यातील ५०० वर्षे जुन्या दर्ग्याजवळ फटाके फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तिथल्या पोटनिवडणुकीत मुस्लिमांना मतदान करायला सांगणाऱ्या शरद पवारांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही, याकडे ओवेसी यांनी लक्ष वेधले.