संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

देशात 13 हजार 216 नवे कोरोना रुग्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्‍ली – कोरोनाचा कहर संपला असे वाटत असताना आता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात जात आहे. देशात आज 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो.
देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून 68 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 68 हजार 108 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासांत 8 हजार 148 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर 0.16 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.63 टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात कोरोना महामारी सुर झाल्यास आतापर्यंत एकूण 4 कोटी 26 लाख 90 हजार 845 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 4165 नवीन रुग्णांची नोद झाली आहे. तर दिल्लीमध्ये 1797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami