संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

देशात २४ तासांत १६,१५९ नव्या कोरोना रुग्णांची भर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,१५९ नवे रुग्ण आढळले, तर २८ मृत्यूंची नोंद झाली. तसेच १४,६८४ लोक कोरोनातून बरे झाले. आता देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १,१५,२१२ इतकी आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ४,२९,०७,३२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर आतापर्यंत १,९८, २०,८६, ७६३ इतक्या जणांचे कोरोना लसीकरण झाले आहे.

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास येथे मंगळवारी ६५९ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १२८९ लोक कोरोनामधून बरे झाले. तसेच मुंबईत आतापर्यंत १०,९०,१०३ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या येथील सक्रिय रुग्णांची संख्या ६,४०९ इतकी आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या महाराष्ट्रात २०,८२० सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढू लागली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami