संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

देशात बुधवारी ५,३३७ नवे कोरोना रुग्ण आढळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. देशातील दररोज वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. भारतात बुधवारी दिवसभरात ५ हजार ३३७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ जणांचा मृत्यू झाला. तसेच देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ३२ हजार ४९० वर पोहोचली आहे.

बुधवारच्या नव्या रुग्णांपैकी ५५० रुग्ण राजधानी दिल्लीतील आहेत. दिल्लीत आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या १९ लाख ९ हजार ९९१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २६ हजार २१४ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तसेच मुंबईत बुधवारी कोरोनाच्या १ हजार ७६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ही २६ जानेवारीनंतरची एका दिवसातील सर्वाधिक वाढ होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami