संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

देशात पुन्हा कोरोनाची रुग्णवाढ! एका दिवसात १८,८४० नवे रुग्ण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्‍ली- ओमिक्रॉनच्या बीए.२.७५, बीए.२.३८, बीए.४ आणि बीए.५ या नव्या अवताराने भारतात शिरकाव केल्यामुळे देशाच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. एका दिवसात देशात १८ हजार ८४० नव्या रुग्णांची भर पडली असून ४३ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. काल १६ हजार ८१५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले होते. ३८ जणांचा करोनाने बळी घेतला होता. आजच्या रुग्णवाढीमुळे देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २५ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या जाहीर केली. त्यात एका दिवसात १८ हजार ८४० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४ कोटी ३४ लाख ३३ हजार ३४५ झाली. आतापर्यंत देशातील ५ लाख २५ हजार ३८६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्युदर १.२० टक्के आहे. देशात सध्या १ लाख २५ हजार २८ रुग्ण उपचार घेत आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचे हे प्रमाण ०.२९ टक्के आहे. कालच्या तुलनेत आज २,६९३ एवढी रुग्णवाढ झाली आहे. १६ हजार १०४ जणांनी २४ तासांत कोरोनावर मात केली. देशाचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ४.१४ टक्के आहे. ४ कोटी २९ लाख ५३ हजार ९८० जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट ९८.५१ टक्के आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी कोरोनाचे ५३१ नवे रुग्ण सापडले.र तीन जणांचा मृत्यू झाला. ६७९ जणांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात ५७९ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आणि एकाचा मृत्यू झाला. दिल्लीत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या २,३२९ आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami