मुंबई- वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल हवामान विभागाने पुढील ५ दिवस देशातील ९ राज्यांमध्ये गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच देशातील काही राज्यात थंडीची लाट येणार आहे तर काही राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने ४ डिसेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटे,अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर ४० – ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला होता.अंदमान आणि निकोबार बेटांवर गडगडाट होण्याची शक्यता आहे.जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये काही ठिकाणी हिमवर्षाव किंवा पाऊस पडू शकतो.उत्तर,मध्य आणि पूर्व भारतातील एकाकी ठिकाणी पहाटे दाट धुके पडू शकते. किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.पूर्व राज्यातही मुसळधार पाऊस पूर्वेकडील राज्यातही मुसळधार पावसाने कहर केला आहे.आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेशात रिमझिम पाऊस पडेल. या भागात ३ दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.अंदमान आणि निकोबार कर्नाटक केरळ तामिळनाडू लक्षद्वीपमध्ये तीन ते चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान,पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल गुरुवारी चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे ४ आणि ५ डिसेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.