संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

देशातील विमानतळांवर आता खासगी सुरक्षारक्षक नेमणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली-दे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात सत्तेवर आल्यापासून सर्वच क्षेत्रामध्ये खासगीकरणाचे जोरदार वारे वाहू लागल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत आहे.या विरोधकांच्या आरोपाला बळकटी देणारा आणखी एक निर्णय केंद्र सरकारकडून धेण्यात आला आहे.आता देशातील भारतीय विमानतळांवर खासगी सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत.विमानतळांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात बदल करून सरकारने ३ हजार हजारांहून अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची पदे रद्द केली आहेत.त्याठिकाणी खासगी सरक्ष रक्षक भारती केली जाणार आहे.
देशातील ५० विमानतळांवर या केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ही योजना नागरी विमान उड्डाण खाते व गृहखात्याने संयुक्त रूपाने तयार केली आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची ३०४९ पदे रद्द करण्यात आली आहेत.याठिकाणी आता १९२४ नव्याने खासगी सुरक्षा रक्षक नेमले जाणार आहेत. नवीन सुरक्षा धोरणानुसार विमानतळांवर सीसीटीव्ही आणि सामानासाठी स्कॅनर इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.त्याचप्रमाणे वायुदलात १९०० नवीन पदांची भरतीही केली जाणार आहे.त्यामुळे वाढत्या विमानतळ संख्येमुळे निर्माण होणारी सुरक्षेची अडचण दूर होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami