संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

देशातील मोदी सरकारचा मोठा निर्णय तेल कंपन्यांना २२ कोटींचे अनुदान मंजूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशातील तीन तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तीन तेलकंपन्यांना २२ हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या दोन वर्षात देशातील महागड्या गॅसमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणुन तेलकंपन्यांना हा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
वास्तविकता पेट्रोलियम मंत्रालयाने यापूर्वी ३० हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती. मात्र सरकारने २२ हजार कोटींना मंजुरी दिली आहे.देशातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अर्थात आयओसी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन म्हणजेच एचपीसीएल या तीन तेल कंपन्यांना हे अनुदान मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात म्हणजे जून २०२० ते जून २०२२ मध्ये एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किंमती तब्बल ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.तरीही या वाढत्या दराचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून एलपीजीच्या किंमती वाढवल्या नव्हत्या. याकाळात घरगुती एलपीजी गॅस ७२ टक्क्यांनी वाढला होता.यामुळे या तेल कंपन्याना मोठा फटका बसला आहे. तोट्यात असतानाही घरगुती गॅस पुरवठ्यावर या तिन्ही तेल कंपन्यांनी त्याचा परिणाम होऊ दिला नाही.त्यामुळेच आता सरकारने उदार मनाने या कंपन्यांना ही एकरकमी २२ हजार कोटींची रक्कम मंजूर केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami