संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

देशातील पहिले खगोल निरीक्षण केंद्र
लडाखमध्ये तीन महिन्यांत उभारणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती

नवी दिल्ली- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हाती घेतलेल्या आगळ्या वेगळ्या आणि अशा स्वरूपाच्या पहिल्याच उपक्रमा अंतर्गत भारतामधील पहिले खगोल निरीक्षण केंद्र लडाखमध्ये उभारले जाणार असून हा प्रकल्प पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे,अशी माहिती केंद्रीय विज्ञान,तंत्रज्ञान आणि अवकाश राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी काल शनिवारी दिली.
केंद्रीयमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली येथे लडाखचे नायब राज्यपाल आर.के. माथूर यांच्या भेटीनंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे खगोल निरीक्षण केंद्र ‘ डार्क स्काय रिझर्व्ह “या नावाने ओळखले जाणार असून ते लडाखमधील हानले येथे उभारले जाणार आहे. तसेच ते चांगथांग वन्य जीव अभयारण्याचा भाग असणार आहे.त्यामुळे भारतामधील खगोल पर्यटनाला चालना मिळेल, तसेच ते ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे टेलिस्कोपसाठीचे जगातील सर्वात उंचीवरच्या स्थळांपैकी एक असेल. प्रस्तावित डार्क स्पेस रिझर्व्ह सुरु करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश प्रशासन,लडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद (एलएएचडीसी) लेह आणि भारतीय खगोल भौतिक शास्त्र संस्था (आयआयए) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी झाल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिली.ते म्हणाले, स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उपक्रम आयोजित केले जातील.
दरम्यान,भारत,कोरिया आणि अमेरिकेच्या शास्त्रीय सर्वेक्षणात वायू गुणवत्ता, विद्युत प्रदूषण,जलवायू आणि वातावरण शुद्धतावर आधारित स्थळांचा शोध घेण्यात आला.त्यात जगातील आठ विशेष ठिकाणे मागील ४० वर्षातील आकड्यांच्या निकषांवर निवडण्यात आली होती.त्यात लडाखमधील लेह जवळच्या या हानलेला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami