गोंदिया – महाराष्ट्रात सध्या राजकीय बरीच राजकीय उलथापालथ सुरु आहे. अशावेळी एखाद्या नेत्याचे सूचक विधान पुढील घडामोडींचे संकेत ठरू शकतात. महाराषट्रात भाजप राष्ट्रवादीत फारसे मतभेद नाहीत. याच पार्शवभूमीवर आज गोंदिया येथील एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. यावेळी फडणवीस हे माझे छोटे बंधू आहेत असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पटेलांच्या विधानामुळे माविआ मध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल एकाच मंचावर आले होते. प्रफुल पटेल यांचे वडील मनोहर भाई पटेल यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीस उपस्थित होते. विशेष म्हणजे गोंदिया, भंडारा जिल्हा प्रफुल्ल पटेलांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचंही होम ग्राऊंड आहे आणि पटेल व नाना यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तसेच काँग्रेसमधील वादावादीमुळे आधीच नाना पटोले स्वपक्षीयांच्या टार्गेटवर असताना प्रफुल्ल पटेल यांच्या मंचावर देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. तसे पाहता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात कधीच तीव्र मतभेद दिसले नव्हते. शिवसेना आणि भाजपात सरकार बनवताना सुरुवातीला जेंव्हा वाद झाला होता आणि शिवसेना महिनाभर तटस्थ राहिली होती तेंव्हा राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली होती . हे सर्व पाहता प्रफुल पटेल आणि फडणवीस यांचे एकत्र येणे यातून काहीतरी हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत.