संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये सर्वांना आव्हान केले आहे.
दरम्यान, कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार, हे पाहावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. देवेंद्र फडणीस हे शनिवारी लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा सोलापूर दौरा महत्त्वपूर्ण मानला जात होता. या भेटीत फडणवीस दोन अपक्ष आमदारांची भेट घेऊन त्यांची मतं वळवण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्हं होती. मात्र, त्यांना ताप आल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आवर्जून वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami