संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरवरून अमित शहा यांचा फोटो गायब

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच ही नाराजी अधिकच उघड करणारी एक मोठी घटना समोर आली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत भाजपाकडून जल्लोष केला जाणार आहे. या जल्लोषासाठी ठिकठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवर भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो नाही. त्यामुळे फडणवीस आता खरंच अमित शहांवर नाराज आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतानादेखील त्यांनी उपमुख्यमंत्रपद का घेतले? वरिष्ठांच्या आदेशानंतरच फडणीसांना हा निर्णय घेणे भाग पडले का? अशा चर्चा सुरू झाल्या. विशेष बाब म्हणजे, शपथविधीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आपण सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे फडणवीसांनी जाहीर केले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह अमित शहा, जे.पी नड्डा यांनी ट्विट करत फडणवीसांना उपमुख्यमंत्रपदी विराजमान होण्याचे आदेश दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami