संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

देवबाग येथे मच्छिमारी बोट बुडाली
एक जण बेपत्ता! दोघांना वाचविले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील देवबागच्या समुद्रात मच्छिमारी करून किनार्‍यावर परतणार्‍या एका मच्छिमारी बोटीला आज सकाळच्या सुमारास समुद्राच्या अजस्त्र लाटांनी तडाखा दिल्याने ती बोट उलटून बुडाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णु राऊळ (55) हे बेपत्ता झाले आहेत. तर या नौकेतील गौरव राऊळ आणि गंगेश राऊळ या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. याबाबतची माहिती पोलीस येरागी यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून समुद्राला उधाण आहे. वादळी वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला आहे. समुद्रात अजस्त्र लाटा उसळत आहेत. परिणामी मच्छिमारांनी मासेमारीला जावू नये, असे आवाहन मत्स्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आज सकाळी विष्णु राऊळ हे आपल्या बोटीतून मच्छिमारीसाठी गेले होते. यावेळी लाटांच्या तडाख्याने त्यांची बोट समुद्रात उलटली आणि बोटीवरील तिघेजण समुद्रात पडले. यावेळी दोघांना वाचविण्यात यश आले असून, विष्णु राऊळ हे बेपत्ता
झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami