संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

दुकानांवर मराठी पाट्यांसाठी मान्सूननंतरची मुदतवाढ द्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुंबई महानगरातील दुकाने आणि आस्थापनांना मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असतानाही मराठी नामफलकांच्या पूर्ततेसाठी मान्सून नंतरची मुदतवाढ द्या, अशी मागणी मुंबईतील व्यापारी संघटनांनी पुन्हा एकदा केली आहे. मात्र व्यापारी संघटनांनी ही मुदतवाढ आणखी वाढवून मान्सूननंतर तीन महिन्यांची वेळ या पूर्ततेसाठी द्यावी, अशी विनंती केली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनकडून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना पत्र लिहिण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात पाच लाख दुकान आणि आस्थापना आहेत. त्यामुळे या दुकानांवर मराठी नामफलक मोठ्या अक्षरात करण्यासाठी रि-डिझाईन करण्यासाठी फंड, पैसा दुकान मालकांकडे असणं आवश्यक आहे. शिवाय, रि-डिझाईनचे काम मान्सून जवळ येत असताना पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे मान्सूननंतर तीन महिन्याचा कालावधी मराठी नामफलक मोठ्या अक्षरात करण्यासाठी मिळावा, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे. याआधी सुद्धा दोन वेळा मोठ्या अक्षरात मराठी नामफलकाच्या पूर्ततेसाठी व्यापारी संघटनांच्या विनंतीद्वारे मुदतही वाढवून दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा ही मुदतवाढ दुकान मालकांना दिली जाणार की कारवाई होणार हे बघावं लागेल.कारण मुंबईत दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिकेकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत मराठी पाट्या लावण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. आधी ही मुदत ३१ मेपर्यंत ठेवण्यात आली होती. ३१ मे रोजी मुंबई महापालिकेने सर्वेक्षणालाही सुरुवात केली होती. आता ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. ३० जूनपर्यंत दुकानदारांनी मराठीत कराव्यात. मराठी नाव मोठ्या अक्षरात असावं, असा नियम लागू करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami