मुंबई: – शिवसेनेतल्या बंडाखोरी नंतर उद्धव ठाकरे , एकनाथ शिंदे यांनी एकत्र येण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या दीपाली सय्यद या आता शिंदे गटात सामील होणार आहे. शनिवारपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्विकारणार आहोत. मात्र या वेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणे बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत, असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा झाली आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जातो, याचे उत्तम उदाहरण संजय राऊत आहेत. संजय राऊत यांच्यामुळे दोन गट पडले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहणे माझ कर्तव्य आहे, असे दीपाली सय्यद म्हणाल्या. उद्धव ठाकरे गटात सय्यद यांनी विशेष प्रभाव पाडला नव्हता. आता त्या शिंदे गटात सामील होणार आहे.