संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लगाम! केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना लगाम बसण्यासाठी तसेच मुलांना लक्ष्य करून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करण्यापूर्वी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

फसव्या जाहिरातींवर प्रतिबंध आणि भ्रामक जाहिरातींसाठी समर्थन-2022 अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता प्रसिद्ध तारकांनाही जाहिरातींसाठी जबाबदारी निश्चित करावी लागणारआहे. केंद्रकडून सरोगेट जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार जाहिरातींची सत्यता सिद्ध केल्याशिवाय ती प्रकाशित करता येणार नाही. नवीन नियम प्रिंट, टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी लागू होणार असल्याचे ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रसिद्ध सेलिब्रिटी यापुढे कोणतीही जाहिरात समजून न घेता आणि उत्पादनाबाबत सविस्तर जाणून घेतल्याशिवाय जाहिरात करू शकणार नाहीत. यासाठी त्यांना जाहिरातीसह उत्पादनाच्या दर्जाचे प्रमाणपत्र मान्य करावे लागणार आहे. त्याशिवाय जर सेलिब्रिटींचा कंपनीत भागभांडवल असेल किंवा कंपनीची मालक असेल, तर त्याला याची माहितीही ग्राहकांना द्यावी लागणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami