संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

दिवाळीत देशातील तीन राज्यात फटाके फोडण्यावर बंदी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*राजस्थानात दोन तास ग्रीन फटाके फोडता येणार

नवी दिल्ली- प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर दिल्लीसह ओडिशा आणि चंदीगड राज्यात बंदी घालण्यात आली आहे. तर राजस्थान सरकारने राज्यात फटाके फोडण्याबाबत नियम लागू केले आहेत. राजस्थानमधील जिल्ह्यांमध्ये फक्त दोनच तास ग्रीन फटाके फोडता येतील. गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
राजस्थान सरकारच्या आदेशानुसार, दिवाळी सणाच्या दिवशी सकाळी ६ ते ८ या वेळेत ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.ख्रिसमस, नवीन वर्ष, छठ सणाच्या दिवशीही हा नियम लागू राहिल. कोरोना संकटात रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे राज्यस्थान सरकारने १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत राज्यात त्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घातली होती.आता राजस्थानमध्ये फटाके फोडण्यावर निर्बंध लादण्यात आली आहे.तर देशाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीसह चंदीगड आणि ओडिशा राज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिल्लीत फटाके विक्री आणि फोडण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी जानेवारी २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.दरम्यान, गेल्या वर्षी कर्नाटक,पश्चिम बंगाल, सिक्कीममध्येही फटाक्यांवर बंदी जाहीर करण्यात आली होती.दुसरीकडे,महाराष्ट्र सरकारनेही एसओपी जारी करून नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami