संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा ३ दिवस स्थगित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- संपूर्ण देशभरात दिवाळी सण जल्लोषात साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची भारत जोडो यात्रा तीन  दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.ही भारत जोडो यात्रा २४ ते २६ ऑक्टोबर बंद राहणार आहे.२७ ऑक्टोबर रोजी सर्व पदयात्री पुन्हा भारत जोडो यात्रेत सहभागी होतील अशी माहिती कॉंग्रेसच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दिली आहे.

कॉंग्रेस नेते सध्या दिवाळीनिमित्त दिल्लीमध्ये आहेत तर इतर काही पक्ष सदस्य आपापल्या गावी दिवाळीसाठी गेले आहेत.त्याचप्रमाणे उद्या बुधवार २७ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी  हे काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे यांच्या पदग्रहण समारंभाला उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा यात्रा सुरू होईल.वास्तविक ७ सप्टेंबर पासून तमिळनाडूतील कन्याकुमारी येथून कॉंग्रेसच्या या भारत जोडो
यात्रेला सुरुवात झाली आहे.या यात्रेने आतापर्यंत १ हजार किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.या यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.ही यात्रा ज्यावेळी कर्नाटकातील
मंड्या येथे पोहचली होती.त्यावेळी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यादेखील या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami