संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

दिवस चांगला जाण्यासाठी चक्क चार मुंगूस पाळले; वनविभागाची कारवाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

डोंबिवली – मुंगूस दिसल्यास दिवस चांगला जातो आणि धनप्राप्ती होते, असा अनेकांचा समज असतो. याच समजातून डोंबिवलीतील एका व्यक्तीने चक्क घरातच चार मुंगूस पाळल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाने याप्रकरणी मुंगूस पाळणाऱ्यांविरोधात कारवाई केली असून चार मुंगूसांची पिंजऱ्यातून सुटका केली आहे. दरम्यान, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्याअंतर्गत मुंगूस पाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगूसाचे तोंड पाहिल्यावर दिवस चांगला जातो आणि धनप्राप्ती होते, असा समज डोंबिवली पश्चिम भागात राहणाऱ्या विठ्ठल जोशी यांचा होता. ते शास्त्री नगर जुनी डोंबिवली परिसरातील गणेश स्मृती येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांनी एका जंगलातून चार मुंगूस पकडून आणून आपल्या घरात एका पिंजऱ्यात ठेवले होते. या प्रकाराबाबत कल्याण वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाली आणि वनविभागाच्या पथकाने तातडीने विठ्ठल जोशी यांच्या घरी छापा मारून पिंजऱ्यात कैद असलेले चार मुंगूस ताब्यात घेतले. कायद्याने बंदी असलेले वन्यजीव प्राणी पाळू नये, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे वाचकांनो, तुम्ही घरात असे प्राणी पाळत असाल तर सावध व्हा, अन्यथा वनविभागाकडून तुमच्यावरही कारवाई होऊ शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami