नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील प्राणी संग्रहालयात असलेल्या १४ वर्षे वयाच्या पांढऱ्या रंगाच्या हिपॅटायटीस या यकृताच्या आजारामुळे मृत्यू झाला. गेल्या शनिवारपासून या वाघिणीने अन्नत्याग केला होता. ‘वीणा राणी’ असे या वाघिणीचे नाव होते.
या प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,आम्ही या वाघिणीला गेल्या शनिवारी रात्री जेवण दिले होते.पण ते तिने खाल्ले नव्हते. म्हणून आम्ही तिला सूप द्यायला सुरुवात केली.तसेच रक्त तपासणीसाठी घेतले.त्यात क्रिएटिनचे प्रमाण कमी आढळले.यामध्ये हिपॅटायटीस होऊन तिचे यकृत निकामी झाले होते. तिच्यावर उपचार सुरू होते.
पण काल सोमवारी संध्याकाळी तिने आपला प्राण सोडला.वीणा राणी ही या प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण होते.असा पांढरा वाघ बंगालमध्ये आढळतो. त्याला बंगाली टायगर म्हणतात.तो सुंदरबन तसेच मध्य प्रदेश,आसाम,
बिहार आणि ओरिसा राज्यातील जंगलात आढळतो.