संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

दिल्लीत पावसाचा कहर! शाळांना सुट्टी जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली प्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली-एनसीआर आणि गुरुग्राममधील अनेक भागातही पाणी साचले आहे.परिस्थिती पाहता गाझियाबाद,आग्रा, फिरोजाबाद,मैनपुरी, नोएडा, इटावा येथील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, बल्लभगढ, कैथल, नरवाना, कर्नाल, फतेहाबाद आणि त्याच्या लगतच्या भागात पुढील काही तासांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. मुसळधार पाऊस पडेल. दुसरीकडे, हरियाणातील राजौंड, असंध, आदमपूर, हिस्सार, हंसी, सिवानी, मेहम, तोशाम, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, मत्तनहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली, महेंद्रगड, सोहाना, रेवाडी, पलवल, नारनौल, बावल, नूहमध्ये पावसाची शक्यता आहे.उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरूच होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami