संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

दिल्लीतील ‘एम्स’ मध्ये खासदारांना व्हीव्हीआयपी उपचार मिळणार नाही

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – दिल्लीतील ‘एम्स’ने विद्यमान खासदारांना व्हीव्हीआयपी उपचारांसाठी विशेष वागणूक देण्याचा आदेश मागे घेतला आहे.एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे मुख्य प्रशासकीय अधिकारी देवनाथ साहा यांनी काल शुक्रवारी लोकसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव वाय.एम. कांडपाल यांना याबाबत पत्र लिहून माहिती दिली आहे.त्यामुळे देशातील सर्व खासदारांना यापुढे एम्स मध्ये व्हीव्हीआयपी उपचार मिळणार नाही.

दिल्लीच्या एम्समधील खासदारांच्या वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थेसंदर्भातील एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांचे पत्र तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.
एम्सचे संचालक डॉ. एम. श्रीनिवास यांनी एम्समधील विद्यमान खासदारांच्या वैद्यकीय सेवेच्या व्यवस्थेसंदर्भात लिहिलेले पत्र तातडीने रद्द करण्याबाबत फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन्सने (एफईएमए) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना पत्र लिहिले होते.दिल्लीतील एम्सकडून खासदारांच्या उपचारासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी करण्यात आली होती. या एसओपी अंतर्गत खासदारांच्या उपचार आणि देखभाल व्यवस्थेचा समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र, डॉक्टरांच्या एका गटाने हे ‘व्हीआयपी कल्चर’ असल्याची टीका केली होती.त्यामुळे अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami