प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १९ जुलै १९६१ हैद्राबाद येथे झाला. हर्ष भोगले हा जगभरच्या क्रीडा रसिकांना माहीत झालेला भारतीय समालोचक आणि क्रीडापत्रकार!
विशेषतः क्रिकेटवेड्या दर्शकांना तो ओळखीचा झाला ते १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रलिया दौऱ्यापासून. मूळचे केमिकल इंजिनियर (बी. टेक.) आणि अहमदाबादच्या ‘आय.आय.एम’चा पदवीधर असणाऱ्या हर्ष भोगले हे राज्य पातळीवर क्रिकेट खेळले होतं. हर्षा भोगले हे एपीसीए आणि उस्मानिया विद्यापीठासाठी क्रिकेट खेळले आहेत. सुरुवातीला अॅडव्हर्टायझिंग कंपनीत नोकरी करून झाल्यावर त्याने क्रीडा समालोचकाचा व्यवसाय निवडला. हर्षां भोगले यांनी १९८९ मध्ये प्रथम सचिनची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्यांनी क्रिकेट पत्रकारितेकडे गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली.
हर्षा भोगले हे पहिले समालोचक आहेत की ज्यांना ११९२ विश्वचषकाच्याआधी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बोलावलं होतं, व हर्षा भोगले यांना ‘सेक्सीएस्ट व्हॉईस ऑन रेडिओ’ असं संबोधलं होतं. हर्षा भोगले यांनी टीव्हीवर काही कार्यक्रमही केले. हर्षा ऑनलाइन, स्कूल क्विझ ऑलिम्पियाड, हर्षा अनप्लड हे कार्यक्रम ईएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्ससोबत केले होते. तर त्यांचा ईएसपीएनवरील ‘हर्षा की खोज’ हा रियालिटी शो देखील बराच गाजला होता. समालोचक या भुमिके सोबतच त्यांनी डिस्कव्हरी चॅनलवर ‘ट्रॅव्हल विथ हर्षा भोगले’ हा कार्यक्रमही केला होता.एबीसी, ई.एस.पी.एन, स्टार स्पोर्टस् आणि ‘बीबीसी’ सारख्या प्रख्यात कंपन्यांच्या समालोचकांच्या चमू मध्ये ते आता मानाचं स्थान पटकावून आहेत.
इंडियन एक्स्प्रेस आणि लोकसत्ता या दैनिकांमधून प्रकाशित झालेले हर्षां भोगले यांचे स्तंभलेखन ‘आऊट ऑफ द बॉक्स – वॉचिंग द गेम वुई लव्ह’ हे पुस्तकद्वारे प्रकाशित झाले आहे.या पुस्तकाला सचिन तेंडुलकरची प्रस्तावना लाभली आहे. ‘दी विनिंग वे’ आणि ‘आउट ऑफ दी बॉक्स’ ही त्याची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
हर्षा भोगले आणि त्यांची पत्नी अनिता भोगले हे स्पोर्ट्सशी निगडीत ‘प्रोसर्च’ ही कम्युनिकेशन कन्सलटन्सी चालवतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३