संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

दिनविशेष : अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ३ जून १९५१ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथे झाला.

जिल बायडेन या माहेरच्या जिल जॅकब्स. जवळ जवळ तीस वर्षं शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या जिल बायडेन यांना सर्वसामान्यांप्रमाणेच जगायला आवडतं. २००८ मध्ये जिल बायडन प्रथमच चर्चेत आल्या जेव्हा त्यांचे पती जो बायडन हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष झाले. जो बायडन हे आधीपासून राजकारणात आहेत त्यांच्यासाठी जिल बायडन ह्या सर्वात विश्वासू राजकीय सल्लागार होत्या. जिल बायडन यांनी जरी फर्स्ट लेडी बनल्या असलो तरी आपण नोकरी करत राहणार हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्या मुळे बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्या मुळे व्हाइट हाउसमध्ये राहूनही पूर्ण वेळ नोकरी करणाऱ्या त्या इतिहासात पहिल्या फर्स्ट लेडी असतील.६९ वर्षांच्या जिल ह्या डेल्वर राज्यातील कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवतात. आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.‌ न्यू जर्सी येथे जन्मलेल्या जिल यांनी आपलं बालपण पेनसिल्व्हेनियामध्ये घालवलं जिथे त्यांचे वडील एका बँकेत काम करायचे. तर त्यांची आई गृहिणी होती. शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आधी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला पण लवकरच त्यांना त्याचा कंटाळा आला. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेत करिअर करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजीच्या अभ्यासादरम्यान जिल यांची भेट बिल स्टिव्हनसन यांच्याशी झाली. या भेटीनंतर त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. त्यानंतर १९७५ साली त्यांचा घटस्फोट झाला.

ज्यावेळी जिलचा घटस्फोट झाला होता त्याच वेळी जो बायडन यांच्या पत्नीचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची जिल यांच्याशी भेट झाली.‌ १९७७ मध्ये दोघं रिलेशनशिपमध्ये आले या काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राजकीय जीवनात बरेच चढ-उतार आले पण त्या दोघांनी एकमेकांची साथ कधीच सोडली नाही.
बायडन यांनी आपल्या ‘प्रॉमिस टू कीप’ या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख केला आहे.

जिल बायडन या अमेरिकेची सेकंड लेडी असूनही जेव्हा जिल यांनी इंग्रजी शिक्षिकेची नोकरी सोडली नाही तेव्हा त्या सर्वांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आपले पती उपराष्ट्रपती असून सुद्धा त्या पूर्ण वेळ शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. जेव्हा त्यांच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा आपल्या पतीसोबत त्या राजकीय मोहिमेसाठी जायच्या.
माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी नो पीपल मासिकाला मुलाखत देताना विनोद केला होता, त्यावेळी त्यांनी जिल यांना उद्देशून असं म्हटलं होतं की- “अरे हो मी हे विसरतेच की तुझ्याकडे फुल टाईम नोकरी सुद्धा आहे”.
अमेरिकेची सेकंड लेडी असलेल्या जिल यांचे पती जो बायडन यांच्याशी संबंधित अनेक वाद जोडले गेले. १९९१ मध्ये लॉ प्रोफेसर अनिता हिल यांनी सुप्रीम कोर्टाच्या नॉमिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता.‌ त्यावेळी जो बायडन हे सिनेट ज्युडीशरी कमिटीचे प्रमुख होते. त्यांच्यावर असा आरोप केला जात होता की त्यांनी या खटल्याची सुनावणी योग्यप्रकारे केली नाही याबद्दल जिलना विचारलं त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं की ही आता पुढे जाण्याची वेळ आहे. आणि त्यांनी तो विषय टाळला.

इतकेच नाही तर काही महिलांनी जोवर देखील विनयभंगाचा थेट आरोप केला यावरही जिलचा प्रतिसाद अस्पष्ट होता. त्यांनी आपल्या ‘Where the light Enters’ या पुस्तकात या गोष्टीचा उल्लेख करताना ‘माझा नवरा खूपच चांगल्या कुटुंबातून आहे’ असं म्हटलं आहे.

  • संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami