संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! अभिनेत्री आणि निर्माती आयशा दत्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अभिनेत्री व जॅकीश्रॉफ यांच्या पत्नी आएशा दत्त यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म ५ जून १९६० रोजीझाला.

आयशा श्रॉफ हे नाव बॉलिवूडसाठी नवीन नाव नाहीये. आयशा एक अभिनेत्री आणि निर्माती आहे. आयशा दत्त यांचे लग्नाच्या आधी नाव आयशा दत्त असे होते. १९८७ मध्ये आयशा दत्त यांनी जॅकी श्रॉफ यांनी लग्न केले. आयशा दत्त यांनी तेरी बाहों में या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्यं दिली होती. त्यांनी ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘ग्रहण’ आणि ‘बोम्बिल एंड बी ट्राइस’ या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कतरिना कैफने ‘बुम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये एंट्री केली. तिचा हा चित्रपट चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटाची देखील आयशा दत्तच निर्माती होती.
आयशा दत्तने अनेक चित्रपटांची निर्मिती केली असली तरी तिने केवळ एकाच चित्रपटामध्ये काम केले आहे. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेरी बाहों में’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात मोहनिश बहल तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. उमेश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नवीन निश्चल, परिक्षित सहानी आणि प्रेम चोप्रा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट ‘द ब्लू लॅगून’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.
आयशा व जॅकी श्रॉफ यांच्या मुलाचे नाव टायगर आणि मुलीचे नाव कृष्णा आहे. टायगर श्रॉफने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ‘हीरोपंती’चित्रपटातून बॉलीवूड मध्ये प्रवेश केला आहे.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami