नगरोटा :- काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारकडे पुरावे मागितले. यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असे म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही, आम्ही लष्कराच्या पाठीशी आहोत असे म्हणत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिग्विजय यांच्या वक्तव्याशी काँग्रेस किंवा त्यांचा काहीही संबंध नाही, सिंह यांनी केलेले विधान वैयक्तिक मत असू शकते. आमचे नाही. काँग्रेस आणि भारतीय लष्करावर आपला पूर्ण विश्वास आहे. भारतीय लष्कराने पुरावे देण्याची गरज नाही.
दिग्विजय सिंह यांच्या आरोपानंतर देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच भाजपने दिग्विजय सिंह आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. भाजपने म्हटले आहे की, ‘विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषात अंध झाला आहे आणि त्यांनी सशस्त्र दलांचा अपमान केला आहे’.