मुंबई- गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रस्त असलेले ज्येष्ठ चित्रपट लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक राकेश कुमार यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
राकेश कुमार यांनी खून पसीना, दो और दो पांच, मिस्टर नटवरलाल, याराना, जॉनी आय लव्ह यू, दिल तुझको दिया, कौन जीता कौन हारा, कमांडर आणि सूर्यवंशी (1992) हे चित्रपट बनवले होते. यापैकी त्यांनी दिल तुझको दिया, कमांडर आणि कौन जीता कौन हाराची निर्मिती केली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बॉलीवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.